म्हातारपणात निवडणूक कशाला लढायची?; गडकरींचा सुशिलकुमार शिंदेंना टोला

सोलापूर | सुशिलकुमार शिंदे माझे चांगले मित्र आहेत. पण म्हातारपणात ते निवडणूक कशाला लढवत आहेत, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे उमेदवार सुशिलकुमार शिंदे यांना टोला लगावला आहे.

महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जयसिद्देश्वर शिवाचार्य यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी गडकरी बोलत होते.

गडकरींनी यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीका केली. जाती-धर्माला जे खतपाणी घालत आहेत त्यांना धडा शिकवा, असं ते म्हणाले आहेत.

शिवाचार्य महाराज नक्की विजयी होणार कारण त्यांना मुख्यमंत्री आणि माझं इंजिन जोडलेलं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-रावसाहेब दानवेंना पाडण्याच्या जोरदार हालचाली; 51 गावांची आक्रमक भूमिका

“जनतेने नरेंद्र मोदींना आणखी एक संधी द्यावी”

-भारतात टिक-टॉकवर बंदी; गुगल प्ले स्टोअरवरुन अ‌ॅप हटवलं

-राफेलमुळे आमचं गाव बदनाम झालंय; नाव बदलण्याची राफेलवासियांची मागणी

भाजपचा उमेदवार म्हणतो, ‘मी नक्की पराभूत होणार’!