बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गडकरी म्हणतात,”लखीमपूर घटना म्हणजे केवळ अपघात, राजीनामा मागणं चुकीचं”

नवी दिल्ली | स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ चाललेलं आंदोलन म्हणून शेतकरी आंदोलनाला ओळखण्यात येतं. केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्यासाठी संसदेपासून रस्त्यावर आंदोलन करण्यात आली. या काळात तब्बल 700 हून अधिक शेतकरी मृत्यूमुखी पडले. याच काळात लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेवर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपलं मत मांडलं आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या गाडीनं शेतकऱ्यांना चिरडलं होतं. यात चार शेतकऱ्यांसह एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता. या प्रकरणामध्ये अजय मिश्रा यांचा मुलगा प्रमुख आरोपी आहे. परिणामी देशभरातून मिश्रा यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशात नितीन गडकरी हे मात्र अजय मिश्रा यांच्या बाजूनं उभं असल्याचं दिसत आहे.

लखीमपूर येथील घटना ही मुद्दाम केलेली नसून तो एक अपघात आहे. या घटनेबद्दल राजीनामा मागणं हे राजकारण आहे. सर्व माहिती आता समोर येत आहे. परिणामी राजकारण करण्यात येऊ नये, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. नितीन गडकरी यांच्या या वक्तव्यांन गडकरी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. शेतकऱ्यांसह विविध विरोधी पक्ष गडकरी यांच्यावर जोरदार टीका करत आहेत.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी जरी ही घटना मुद्दाम घडली नाही, असं म्हटलं असलं तरी एआयटीनं मात्र आशिष मिश्राला दोषी ठरवलं आहे. आशिष मिश्रा याच्यावर हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी एसआयटीनं न्यायालयाकडं परवानगी मागितली आहे. तर शेतकऱ्यांसह खासदारांनी मिश्रांच्या राजीनाम्यासाठी जोर वाढवला आहे.

थोडक्यात बातम्या 

iphone 13 सिरीजवर मिळतेय ‘इतक्या’ हजार रुपयांची सूट, जाणून घ्या ही बंपर ऑफर

ओबीसी आरक्षणासंदर्भात केंद्र सरकार उचलणार ‘हे’ मोठं पाऊल

महाराष्ट्र गारठणार! येत्या 24 तासात कडाक्याची थंडी, तज्ज्ञांचा इशारा

धक्कादायक! ‘या’ महिला सरपंचावर आली चक्क भीक मागण्याची वेळ

कोरानाचा परिणाम आता स्पर्म काऊंटवर? संशोधनातून ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More