बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून इंधनाच्या कार वापरणार नाही’; नितीन गडकरींनी वळवला इलेक्ट्रिक कारकडे मोर्चा

नागपूर | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांना बगल देत इलेक्ट्रिक गाडीच्या वापराला सुरुवात केली आहे. पारंपारिक इंधनावर चालणारी गाडी मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करते त्यामुळे शहरात पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने नागपूरला जेव्हा दौरा असेल तेव्हा फक्त इलेक्ट्रिक गाडीच वापरणार असल्याचं गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.

देशाचं इंधन पेट्रोल-डिझेल न राहता बायोफ्यूएल, इलेक्ट्रिक, बायोडिझेल, इथेनॉल अशा प्रकारचे इंधन व्हावे म्हणून मी माझी बुलेट प्रूफ गाडी सोडून इलेक्ट्रिक गाडी वापरायला सुरुवात केल्याचे गडकरी यांनी बोलून दाखवलं आहे. सध्या इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नितीन गडकरी यांनी हे पाऊल उचललं आहे.

यामार्फत जनतेला त्यांनी इलेक्ट्रिक गाड्या वापरून पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा असं आवाहन केलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून सध्या केंद्र सरकारवर सडकून टीका होत आहे. त्यातच केंद्र सरकारने इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इंधनाचे दर वाढवले अशी काही राजकीय पक्षांनी टीकाही केली होती.

सध्या संपूर्ण देशात पेट्रोलने शंभरी गाठली असून सामान्य नागरिकांचा पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर जीव मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे आता केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलेल्या या गोष्टीला लोक किती सकारात्मक प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राजू शेट्टींची टीका, म्हणाले…

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भन्नाट कल्पना; हजाराच्या खरेदीवर एक लिटर पेट्रोल फ्री!

‘बाळासाहेब थोरातांकडून घटनाबाह्यरितीने काम’; ‘या’ शिवसेना खासदाराचा थोरातांवर गंभीर आरोप

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पुढील दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक!

तपासाला सहकार्य करणाऱ्या खडसेंना अटक कशासाठी?; उच्च न्यायालयाचा ईडीला सवाल !

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More