बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नितीन गडकरी म्हणजे चुकीच्या पक्षातील चांगला आणि कार्यक्षम माणूस- अशोक चव्हाण

मुंबई | मोदी सरकारला सत्तेत येऊन सोमवारी 7 वर्ष पुर्ण झाली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीकास्त्र चढवलं. केंद्र सरकारच्या एकूण चुकीच्या धोरणाचा पाढा वाचताना त्यांनी जीएसटी, नोटबंदी आणि कोरोनाच्या कामकाजावर टीका केली आहे.

केंद्रातील भाजप सरकारची एकूणच कामगिरी उणेच असली तरी, केंद्रीय मंत्रिमंडळातील रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणजे  चुकीच्या पक्षातील चांगला आणि कार्यक्षम माणूस असे त्यांचे वर्णन करावं लागेल, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे. रस्ते विकास आणि वाहतूक क्षेत्रातील गडकरी यांच्या कामाचं कौतुक करताना त्यांचे अधिकार काढून घेण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून केले जातात. त्यांची कोंडी केली जात आहे, असं देखील अशोक चव्हाण म्हणाले.

देवेंद्र फडणवीस सरकारने केलेला कायदा जर परिपूर्ण होता तर तो सर्वोच्च न्यायालयात का टिकला नाही?, त्यांनी मराठा समाजाची दिशाभूलच केली होती, असा आरोप देखील फडणवीसांवर केला आहे. विनायक मेटेकडून केली जाणारी टीका स्वत:च्या विधान परिषदेतील जागा राखण्यासाठी आणि भाजप नेत्याच्या पुढे- पुढे करण्यासाठी होत आहे. त्यामुळे त्यांची वक्तव्यं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, असं देखील चव्हाण म्हणाले.

दरम्यान, सत्ता गेल्याचं नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या फुलप्रुफतेचा सर्वोच्च न्यायालयात भांडाफोड झाल्यानं चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे, अशी टीका देखील अशोक चव्हाणांनी चंद्रकांत पाटलांवर याआधी केली होती.

थोडक्यात बातम्या-

“चंद्रकांत पाटलांना मस्ती आलीयो, आपलं हसं होऊ नये म्हणून…”

“मराठ्यांच्या स्वाभिमानाची धडक दिल्लीच्या दरवाजावरच पडली पाहिजे”

‘परमबीर सिंग यांच्या इशाऱ्याने वाझेकडून खंडणी वसुली’; कार डिझायनरच्या पत्राने खळबळ

‘फेसबुक लाईव्ह म्हणजे नुसत्या कोरड्या गप्पा’; मुख्यमंत्र्याच्या भाषणावर भाजपने विचारले हे ‘6’ प्रश्न

एका मृत्यूचा मुद्दा बनवला जातोय, लसीचे दोन डोस घेऊन मेलेल्या अनेक डॉक्टरांचं काय?- बाबा रामदेव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More