बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नितीन गडकरी हे केंद्रातील सर्वात लोकप्रिय नेते – सुप्रिया सुळे

पुणे | लोकशाही ही सत्ताधारी आणि विरोधक यांच्या समन्वयाने चालत असते. देश आणि राज्याचा विकास होण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात योग्य समन्वय असणं आवश्यक आहे. महाराष्ट्राला आदर्श राजकारणाचा मोठा वारसा लाभला आहे. आदर्श राजकारणाचं एक उदाहरण पुन्हा पुण्यातील कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पहायला मिळालं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या दिलखुलास स्वभावासाठी ओळखले जातात. राजकारणातील आजातशत्रू व्यक्तीमत्त्व म्हणून सुद्धा नितीन गडकरी यांची ओळखलं आहे. पुण्यातील विविध विकास कामाचं उद्धाटन करण्यासाठी नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणजे केंद्रातील सर्वात लोकप्रिय नेेते या शब्दात सुप्रिया सुळे यांनी नितीन गडकरी यांची स्तुती केली आहे.

नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात पुण्यासह राज्यातील विविध विकास कामांच्या गतीबद्दल सांगितलं आहे. पुण्यातील वाहतूकीची समस्या सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही काम करत असल्याचं नितीन गडकरी म्हणाले आहेत. सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात नितीन गडकरी यांची तोंडभरून स्तुती केली आहे.

नितीन गडकरी म्हणजे राजकारणातील सुसंस्कृत नेते आहेत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. कात्रज रोडवरील उड्डाण पुलाच्या उद्धाटनाच्या या कार्यक्रमात जोरदार राजकीय संस्कृतपणा पहायला मिळाला.

थोडक्यात बातम्या- 

‘किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर..’; राजू शेट्टीचं किरीट सोमय्यांना आव्हान

युपीएससीचा निकाल जाहीर! बिहारचा शुभम कुमार देशात पहिला, तर पहिल्या शंभरमध्ये महाराष्ट्रातील तिघं

“रावणालाही लाज वाटेल असे मंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बसलेत”

पंतप्रधान मोदींचा मुत्सद्दीपणा! कमला हॅरिस यांना दिलं ‘हे’ खास गिफ्ट

“तिला 52 दिवस तुरूंगात ठेवलं, आता राऊतांनी महिला सन्मानाच्या गोष्टी करूच नयेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More