नितीन गडकरींनी शिवरायांचा अपमान केल्याची नेटकऱ्यांची तक्रार

मुंबई | केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी शिवरायांचा अपमान केल्याची भावना सोशल मीडियात व्यक्त केली जातेय. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातील त्यांच्या वागण्याचा यासाठी दाखल दिला जातोय. 

गतवर्षी राजपथावर महाराष्ट्रातर्फे लोकमान्य टिळक यांचा देखावा दाखवण्यात आला होता. यावेळी नितीन गडकरी यांनी उठून उभे राहत टिळकांना अभिवादन केलं होतं. यंदा शिवरायांचा देखावा समोरुन गेला तरी गडकरी खुर्चीतून उठले नाहीत. 

नितीन गडकरींच्या याच वागण्यावरुन त्यांना लक्ष्य केलं जातंय. सोशल मीडियात यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर पोस्ट पहायला मिळत आहेत.