पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार; नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा
पुणे | पुण्यातील कात्रज परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या कोडींचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मात्र आता पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. कारण केंद्र सरकारने कात्रज जंक्शनच्या परिसरात सहा पदरी उड्डाणपूल बांधण्यासाठी मंजुरी दिली आहे. भूपृष्ठ व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
कात्रज जंक्शनवर उभारण्यात येणारा हा उड्डाणपूल 1,326 मीटर लांब आणि 24.20 मीटर रुंद असेल. पुणे-मुंबई बायपासवरुन सुरु होणारा हा उड्डाणपूल कात्रज-कोंढवा रोडवर उतरेल. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने कात्रज-कोंढवा रोडच्या रुंदीकरणाचं कामही हाती घेतलं आहे.
कात्रज जंक्शनच्या परिसरात सहा पदरी उड्डाणपूल बांधण्यासाठी केंद्र सरकारने 169.15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा उड्डाणपूल पुणे शहर, मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्ग आणि पुणे-सोलापूर महामार्गाला जोडण्यात येईल. हा सहा पदरी उड्डाणपूल पुण्याच्या कात्रज चौकात झाल्यास होणारी वाहतूक कोंडी लवकरच संपुष्टात येणार आहे.
दरम्यान, पुणे महानगरपालिकेने कात्रज जंक्शनजवळ उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली होती. मात्र, हे काम रखडून पडले होते. मात्र, हा उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्गाच्या जंक्शनवर असल्याने नितीन गडकरींनी काम हाती घेण्याचा निर्णय घेतला.
थोडक्यात बातम्या-
‘केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी’; नाना पटोले आक्रमक
प्रकाश जावडेकरांचा पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले…
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका!
मोठी बातमी! मुंबई लोकलवर पुन्हा एकदा निर्बंधांची टांगती तलवार
‘पुण्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर’; सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारकडे केली ‘ही’ मागणी
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.