बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘देशात ऑक्सिजनअभावी अनेकांना जीव गमवावा लागला ‘; गडकरींचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली | ऑक्सिजनच्या अभावी देशात एकाचाही मृत्यू झाला नसल्याचं धक्कादायक उत्तर केंद्र सरकारने दिलं आहे. त्यामुळे विरोधक प्रचंड संतापले आहेत. तसेच केंद्र सरकारवर टीकेची झोड उठत आहे. सोशल मीडियावर देखील सराकरविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. अशात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात स्वत: नितीन गडकरींनी देशात ऑक्सिजनअभावी अनेकांना जीव गमवावा लागल्याची कबूली दिली आहे.

पत्रकार अभिनव पांडे यांनी हा व्हीडीओ ट्विट केला आहे. या व्हीडीओत नितीन गडकरींनी कोविडच्या ह्या काळात आपल्या देशात अनेक जणांना ऑक्सिजनच्या अभावी जीव गमवावा लागला, असं म्हटलं आहे.

केंद्र सरकारच्या उत्तरानंतर विरोधक प्रचंड संतापले असून त्यांनी थेट सरकार विरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून हा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती आहे.

सरकारच्या या वक्तव्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर सडकून टीका केली आहे. केंद्रीय मंत्र्यांचे ते वक्तव्य ऐकून मी अवाक झालोय. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात शेकडो हजारोंचा जीव गेला. ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले, त्यांना केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य ऐकून काय वाटेल ? केंद्र सरकार खोटं बोलत आहे, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी राऊतांनी केली आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

“दादा… दोन हाना पण मला आपलं म्हणा, आता माफ करुन अबोला सोडावा”

…म्हणून इलेक्ट्रीक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार- अजित पवार

‘…तर ही वेळ आलीच नसती’; रावसाहेब दानवेंचा ठाकरे सरकारला टोला

राज्यातील ‘या’ भागात रेड अलर्ट जारी, पुढील 24 तास पाऊस झोडपून काढणार

CET परीक्षेच्या रजिस्ट्रेशनसाठीची वेबसाईट बंद; अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार मुदतवाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More