बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पक्षासाठी खडसेंचं योगदान मोठं, त्यांच्यावर अशी वेळ येणं दुर्भाग्यपूर्ण- नितीन गडकरी

मुंबई |  विधान परिषदेची उमेदवारी मागून देखील एकनाथ खडसे यांना भाजपने उमेदवारी दिली नाही. याउलट गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पारड्यात पक्षाने तिकीट टाकली. यामुळे एकनाथ खडसे यांना आपला राग अनावर झाला आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून ते भाजपवर तोंडसुख घेत भाजपसाठी आपण काय-काय केलं, भाजपची अवस्था अत्यंत दयनीय असताना पक्षासाठी कशा पद्धतीने काम केलं, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. अकूणच खडसे सध्या उद्विग्न झाले आहेत. यावरच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे.

एकनाथ खडसे यांचं भाजपसाठी फार मोठं योगदान आहे. पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी फार हाल अपेष्टा सोसून पक्ष वाढीसाठी त्यांनी काम केलं आहे. पण त्यांच्यावर आता अशी वेळ येणं फार दुर्भाग्याची गोष्ट असल्याच्या भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या आहेत.

भाजपचा सरपंच देखील नव्हता, अशा वेळापासून मी भाजपमध्ये काम करतोय. अनेक वेळा लोकांच्या हितासाठी आंदोलन करून, जेलमध्ये जाऊन, लोकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष केला त्यातून पक्ष उभा राहिला. मी जेव्हा पक्षाचं काम केलं तेव्हा आताचे नेते चड्डीत मुतायचे, अशा शब्दात आपली उद्विगनता खडसेंनी बोलून दाखवली आहे. त्याच भावनांची गडकरींनी कदर केली आहे.

दुसरीकडे पक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या खडसेंना भाजपने घेरण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षाचे अध्यक्ष चंद्राकांत पाटील यांनी खडसेंचे हल्ले परतवून लावण्याची सुरूवात केली आहे. पक्षाने तुम्हाला आणखी किती द्यायचं. तुम्हाला सात वेळा उमेदवारी, मुलाला उमेदवारी, पत्नीला महानंदाच्या अध्यक्षा, मुलीला विधानसभेची उमेदवारी तसंच सूनेला खासदारकी… आता पक्षाने द्यायचं तरी किती? असे एक ना अनेक सवाल चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना केले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

स्थलांतरित मजुरांसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

सांगलीच्या आजीबाईंचा पॅटर्नच वेगळा; वयाच्या 94 व्या वर्षी केली कोरोनावर मात!

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून रणजितसिंह मोहितेंना तिकीट दिलं; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

काळा पैसा भारतात आणण्याची मोदींना संधी; शिवसेनेचा सल्लावजा टोला

कदाचित कोरोना विषाणू कधीच संपणार नाही; जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली भिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More