“स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर शिवरायांचा पुतळा पडला नसता”

Nitin Gadkari | 26 ऑगस्टरोजी सिंधुदुर्गमधील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.   या घटनेमुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळली. याविरोधात महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुती सरकारवर निशाणा साधत याचा निषेध केला. मविआतील प्रमुख नेत्यांनी राज्यात जोडे मारो आंदोलन केले. या प्रकरणावरून आता राजकारण पेटलं आहे. (Nitin Gadkari)

4 डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. पण उद्धाटनानंतर आठ महिन्यातच महाराजांचा पुतळा कोसळला. यामुळे शिवप्रेमीमध्ये प्रचंड नाराजी आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक भिडले आहेत.अशात या प्रकरणावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात कोणतंही बांधकाम करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर होणे गरजेचे आहे. कारण स्टेनलेस स्टीलला गंज लागत नाही, असं नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले आहेत. ते दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांचं हे विधान आता चर्चेत आलं आहे.

नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?

समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात बांधण्यात करताना उड्डाणपूलांसाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला गेला पाहिजे, यासाठी मी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत आहे. मी मुंबईत जेव्हा 55 उड्डाणपूल बांधले तेव्हा मी एका व्यक्तीसोबत फेरफटका मारत होतो. तेव्हा त्याने मला उड्डाणपूलासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडावर पावडर कोटिंग वापरण्यात आल्याचे दाखवले होते.

या पावडर कोटिंगमुळे लोखंड गंजणार नाही, असा दावा त्याने केला. पण, नंतरच्या काळात मुंबईतील उड्डाणपूलांसाठी वापरण्यात आलेल्या लोखंडाला गंज लागला. त्यामुळे आता मला असं वाटतंय की, समुद्रकिनाऱ्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या भागात रस्त्यांचे बांधकाम करताना स्टेनलेस स्टीलचाच वापर करायला हवा. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करतानाही स्टेनलेस स्टील वापरले असते तर हा पुतळा पडला नसता, असे नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले आहेत.

दरम्यान पुतळा कोसळल्यानंतर स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील आणि शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी चेतन पाटील यांना पोलिसांना अटक केली आहे. तर, जयदीप आपटे अद्याप फरार आहे.

News Title –  Nitin Gadkari on Chhatrapati Shivaji Maharaj Statue

महत्त्वाच्या बातम्या-

ढोल-ताशा वादकांसाठी धोक्याची घंटा, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार, साताऱ्यातील घटनेनं मोठी खळबळ

‘या’ राशींवर होईल सुखाचा वर्षाव, नवीन कार्य करण्यास शुभ दिवस

क्रिकेटप्रेमींनो ‘या’ दिवशी रंगणार WTC 2025 फायनल! ICCकडून तारीख जाहीर

पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला गेले तडे!