बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नितीन गडकरी यांचं ट्रम्प यांच्या पावलावर पाऊल; कोरोना संदर्भात मोठं वक्तव्य

नागपूर |   कोरोना व्हायरस हा नैसर्गिक नाही तर तो लॅबमध्ये तयार करण्यात आला आहे, असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेली महिनाभर सातत्याने करत आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील कोरोनाच्या उद्रेकावर मोठं वक्तव्य केलं आहे.

कोरोना व्हायरस नैसर्गिक नाही तर लॅबमध्ये तयार करण्यात आल्याचं गडकरी यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं. सध्या आम्ही कोरोना व्हायरससह आर्थिक लढाई लढत आहेत. भारत गरीब देश असून महिन्या दरमहिन्याला लॉकडाऊन वाढवू शकत नाही. आम्हाला सुरक्षेच्या उपायांसह बाजार खुले करावे लागतील, असं नितिन गडकरी म्हणाले.

अमेरिका, ब्रिटन, इटली सारख्या देशांच्या तुलनेत भारत सुरक्षित स्थितीत दिसत आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचे रुग्ण खूप कमी प्रमाणात आहे. मात्र आता अधिक काळ लॉकडाऊन ठेऊन चालणार नाही, असं ते म्हणाले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर गडकरांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “याचा निर्णय फक्त माझ्या मंत्रालयाकडे नाही. मी याबाबत आशावादी आहे तसंच सकारात्मक देखील आहे”.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

पक्षासाठी खडसेंचं योगदान मोठं, त्यांच्यावर अशी वेळ येणं दुर्भाग्यपूर्ण- नितीन गडकरी

…म्हणून रणजितसिंह मोहितेंना तिकीट दिलं; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

महत्वाच्या बातम्या-

कोरोना युद्धात रतन टाटांचं आणखी एक पाऊल पुढे; ‘या’ दोन राज्यात 4 रुग्णालय उभारणार

‘या’ तारखेपर्यंत लॉकडाउन वाढवण्यासंदर्भात ठाकरे सरकारचं एकमत

‘…म्हणून मेधा कुलकर्णींचा बळी दिला’; खडसेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More