महाराष्ट्राच्या राजकारणात परतण्याची इच्छा नाही- गडकरी

संग्रहीत फोटो

मुंबई | मी दिल्लीत रमलो आहे, आता राज्याच्या राजकारणात परतण्याची इच्छा नाही, असं नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. ते मुबंईतील एका कार्यक्रमात बोलत होते.

महाराष्ट्रात खांदेपालट होण्याची चर्चा दर काही दिवसांनी रंगत असते. निवडणुकीपूर्वी फडणवीसांना केंद्रात बोलवणार आणि गडकरींना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची कमान दिली जाणार असं सांगितलं जातं.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी मात्र ही चर्चा फेटाळून लावली आहे. एक वेळ अशी होती की आपली महाराष्ट्र सोडण्याची इच्छा नव्हती मात्र आता दिल्लीत मन रमलंय, असं गडकरी म्हणाले आहेत.