बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यात तथ्य- नितीन गडकरी

मुंबई | महाराष्ट्र आणि मुंबईची जी दुर्दशा झाली त्याला तत्कालिन 1995 सालचं युतीचं सरकार जबाबदार होतं. त्या सरकारचा झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करून मोफत घरे देण्याचा निर्णय अतिशय चांगला होता. मात्र त्याचे परिणाम पुढील काळात अतिषय वाईट झाले, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. तत्कालिन युती सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सध्याचे केंद्रिय दळवळणमंत्री नितीत गडकरी यांनी राज ठाकरेंच्या या मताशी सहमती दर्शवली आहे.

राज ठाकरेंच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे. तत्कालिन युती सरकारने गरीबांना कायमची आणि हक्कांची घरे मिळावीत म्हणून झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास योजनेच्या अंतर्गत मोफत घरे वाटण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने मुंबईकडे परप्रांतीयांचं स्थलांतर वाढलं आणि त्यानंतर मुंबईची आता आपण दुर्दशा पाहतो आहोत. किती कमी जागेमध्ये लोक राहत आहेत. राज ठाकरेंनी जी भावना व्यक्त केली त्यात काही प्रमाणात तथ्य आहे, असं गडकरी म्हणाले.

महाराष्ट्र जर आपल्याला बघायचं झाला तर आपल्याला 1995 अगोदरचा महाराष्ट्र आणि 1995 नंतरचा महाराष्ट्र असा बघावा लागेल, असंही राज ठाकरे म्हणाले. तसंच बाळासाहेब ठाकरेंचा निर्णय अतिशय योग्य आणि चांगला होता. परंतू त्या निर्णयाने परप्रांतियांचं खूप मोठ्या प्रमाणावर मुंबईत येणं झालं. मग त्यानंतर मुंबई महाारष्ट्राची दुर्दशा तसंच भाषेच्या बाबतीत लोकांमध्ये फरक पडत गेला, असं राज म्हणाले होते.

दुसरीकडे, कोरोनातून आपण सावरल्यानंतर आपल्या शहरांना पूर्ववैभव प्राप्त करून देण्याची आपल्याकडे जबाबदारी असेल. त्या दृष्टीने सगळ्याच राजकीय पक्षांनी राजकारण न करता काही चांगले आणि धाडसी निर्णय घेतले पाहिजेत, असंही मत गडकरी यांनी व्यक्त केले.

ट्रेंडिंग बातम्या-

‘फडणवीसांना ट्रोल करणाऱ्यांना आवरा’; भाजपची पोलीस आयुक्तांकडे मागणी

लॉकडाऊनच्या वाढीव कालावधीसाठी राज्य सरकारने केल्या गाईडलाईन्स जारी

महत्वाच्या बातम्या-

योग्य वेळी राज्यातील जनता मला पुन्हा सत्तेत आणेलच; देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

आम्ही स्वबळावर लढलो असतो तरी आम्ही 144 चा आकडा गाठला असता- देवेंद्र फडणवीस

“प्रवासाचं धोरण एकदाच निश्चित करा; कधी फॉर्म भरून घेताय तर कधी भरलेले फॉर्म वापस घेताय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More