रस्ते नीट दिसले नाहीत तर काॅन्ट्रॅक्टरवर बुलडोजर चालवेन- गडकरी

संग्रहीत फोटो

मुंबई | रस्त्यांची कामं करणाऱ्या कंत्राटदारांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दम भरला आहे. नुकतंच हाती घेतलेलं रस्त्याचं काम जर नीट झालं नाही तर मीच काॅन्ट्रॅक्टरवर बुलडोजर चालवेन, असं त्यांनी म्हटलं आहे. 

आतापर्यंत कामाची ऑर्डर घेण्यासाठी एकाही काॅन्ट्रॅक्टरला माझ्या ऑफिसमध्ये दिल्लीत येथे येण्याची गरज भासली नाही. हे मी मोठ्या अभिमानाने सांगू शकतो, असंही ते म्हणाले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी जलमार्गाचा जरी वापर केला तरी प्रवासी अवघ्या 20 मिनिटांत विमानतळावर पोहचू शकतील अशी आम्ही सोय करणार आहोत, असं ते म्हणाले

दरम्यान, प्रसिद्ध लेखक तुहिन सिन्हा यांच्या ‘India Inspires’ या पुस्तक प्रकाशानावेळी ते मुंबई येथे बोलत होते.

महत्वाच्या बातम्या-

-होय, भाजपने गरज पडेल तसा माझा वापर करुन घेतला- एकनाथ खडसे

-जगाला हेवा वाटावा असा विक्रम पाकिस्तानी गोलंदाजाच्या नावावर!

-‘वसुंधरा राजे खूप जाड झाल्या आहेत, त्यांना आराम द्या’ वक्तव्यावर शरद यादवांच स्पष्टीकरण

-मलाही लग्न करुन सुखी संसार थाटायचा होता, पण… – कतरिना कैफ

-भाजपला मोठा झटका; मोदी सरकारमधील हा मंत्री काँग्रेससोबत जाणार???