बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाने गडकरी हळहळले, म्हणाले…

मुंबई | छत्रपती शिवाजी महारांचा इतिहास घराघरात पोहोचवणारे शिवशाहीर बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांची आज वयाच्या 100व्या वर्षी प्राणज्योत मालवली. शिवशाहीर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतंच 100व्या वर्षात पदार्पण केलं होतं. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण राज्यात शोकाकूल वातावरण पसरलं आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाच्या बातमीने रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शोक व्यक्त केला आहे. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत, जेष्ठ इतिहास संशोधक पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं जाणं अतिशय दु:खद आणि वेदनादायी असल्याचं म्हणत नितीन गडकरी हळहळले आहेत. त्यांनी ट्विट करत बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने शिवचरीत्र आणि शिवरायांचं महत्व समजून सांगितलं. माझ्यासारख्या अनेक तरूणांना त्या काळात बाबासाहेबांनी प्रेरणा दिली. त्यांनी दिलेले संस्कार आणि त्यांनी सांगितलेला इतिहास त्यातुनच व्यक्तिमत्व घडलं असल्याचं गडकरी म्हणाले. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाने बाबासाहेबांचं जीवन अजरामर झालं असल्याचंही गडकरी म्हणाले.

येणाऱ्या पिढ्या अन् पिढ्या बाबासाहेबांना विसरणार नाहीत म्हणत नितीन गडकरींनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर सर्वच स्तरावरून शोक व्यक्त केला जात आहे. छत्रपती शिवाजी महारांचा इतिहास घरोघरी पोहोचवणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करणार नाही?, अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

वयाच्या 100 व्या वर्षी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची प्राणज्योत मालवली

आता आधी पैसे मगच वीज, ठाकरे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

भाजपचा मोठा निर्णय?, चित्रा वाघ यांच्यासाठी आनंदाची बातमी

मुंबईतील कोरोना रूग्णसंख्येत चढउतार सुरूच, पाहा आजची आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More