बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नितीन गडकरींकडून उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाचं तोंडभरून कौतुक म्हणाले…

अहमदनगर | राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या लोकार्पणाचा आणि भूमिपूजनाचा सोहळा आज पार पडला. अहमदनगर जिल्ह्यातील 3 हजार 28 कोटींच्या महामार्गांचे भूमिपूजन तर 1 हजार 46 कोटींच्या रस्त्यांचे लोकार्पण आज केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झालं. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात गडकरींनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचं कौतुक करत स्वागत केलं आहे.

मी काल परवा वर्तमानपत्रात वाचलं की, माननीय उद्धव ठाकरेंनी शिर्डी विमानतळाच्या परिसरात स्मार्ट सिटी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय फार उत्तम आहे. त्यामुळं आता रोड बनला, विमानतळ बनलं की, मी दिल्लीत पाहत असतो, पुढारी येतात आणि अलाईनमेंट दाखवा. रोड कुठून चालला आहे, असं गडकरी म्हणाले.

मी म्हणतो कशासाठी, म्हणतात की, आम्ही जागा घेऊन ठेवतो. त्यामुळं मी आग्रह करतो की, पुुढाऱ्यांनी जागा घेण्याऐवजी सरकारनं जागा घ्यावी. त्या जागेवर तुम्ही डेवलव्हमेंट करावी. स्मार्ट सिटीसह, लॉजिस्टीक पार्क उभारा, त्यामुळं जिल्ह्यात रोजगार निर्मीती होईल, असं म्हणत गडकरींनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं कौतुक केलंय.

दरम्यान, शिर्डी विमानतळाच्या सभोवतालच्या परिसरात पायाभुत सुविधा विकसीत करत सर्व सुविधायुक्त शहर वसवण्यासाठी शिर्डीची निवड करावी. राज्यातील एक चांगलं विकास केंद्र निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्या होत्या. आता मुख्मंत्र्यांच्या निर्णयाचं खुद्द गडकरींनी कौतुक केल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क चर्चांना उधान आलं आहे.

 

थोडक्यात बातम्या –

खड्ड्यांवरुन ठाकरे बंधूंमध्ये जुंपली; अमित ठाकरेंच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

काँग्रेस पक्ष हेडलेस असल्यानं भाजप नेते त्याचा फायदा घेत आहेत – संजय राऊत

कंगना रणौत योगींच्या भेटीला, ‘या’ मोहिमेची बनली ब्रँड अॅम्बेसिडर

….अन् या पठ्ठ्याने नवरीला नेण्यासाठी थेट जेसीबीच मागवला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

“खडसे साहेब एखादा शूटर लावून मला मारुन तरी टाका”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More