बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सीएए: बाबासाहेबांनी घटनेत जे लिहून ठेवलंय तेच आम्ही करत आहोत- नितीन गडकरी

मुंबई | नागरिकत्व सुधारणा कायदा(सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी(एनआरसी) या मुद्द्यांवरुन देशात अशांतता आणि अस्थिरतेचं वातावरण आहे. सीएए आणि एनआरसीला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावर भाष्य केलं आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा हा नवीन कायदा नाही, तर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू यांनी यापूर्वीच लिहून ठेवलं आहे, असं म्हणत गडकरींनी सीएएला समर्थन दिलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

नागरिकत्व कायद्यावरुन लोकांमध्ये भ्रम निर्माण केला जात आहे. राजकीय फायद्यासाठी हे होत आहे. पण या कायद्यामुळे कोणत्याही मुस्लीमाचे नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही, असं आश्वासन गडकरींनी दिलं आहे.

दरम्यान, देशात सीएएला मोठा विरोध होताना दिसत आहे. अनेक लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करताना दिसत आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

काँग्रेस-राष्ट्रवादी कोणत्या प्रेरणेनं शिवसेनेसोबत गेली कळत नाही- गडकरी

छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचा इतिहास दाखवाच, कारण…

महत्वाच्या बातम्या-

‘भारत माता की जय’चा वापर उग्र राष्ट्रवादासाठी होतोय; मनमोहन सिंग यांचं भाजपवर टीकास्त्र

‘वंचित’मध्ये मोठी फूट; दोन माजी आमदारांसह 48 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

“तृप्ती देसाई शांत बसा, नाहीतर आता तोंडात शेण घालू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More