मुंबई | एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन 2020’ या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी विविध विषयांवर दिलखुलास उत्तरे दिली आहे. तसेच मी एकवेळ जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, असं ते म्हणाले आहेत.
मतभिन्नता हा विषय नाही. मतभिन्नता असली तरी चालेल पण मनभिन्नता असता कामा नये. मतभिन्नतेपेक्षाही विचारशुन्यता अधिक घातक आहे. माझा एक विचार आहे, संघटना आहे. मी एकवेळ जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, असं ते म्हणाले आहेत.
माझा विचार आणि निष्ठा पक्की आहे. कधी कधी तुम्ही का जिंकलात आणि तुम्ही का हारलात याचं उत्तर सांगता येत नाही. आम्ही राजकारणात आलो ते काही भगवे कपडे घालून प्रवचन देण्यासाठी नाही. सत्तेत जाण्यासाठी आलो आहोत, असं गडकरी म्हणाले आहेत.
जेव्हा एखादा मुलीवर प्रेम करतो, तेव्हा प्रेमात सर्वकाही माफ आहे असं म्हणतात. राजकारणातही थोडफार तसंच असतं, असं गडकरी म्हणाले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
दोन भाऊ वेगळे झाले म्हणजे नातं तुटलं असं होत नाही- चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील
महत्वाच्या बातम्या-
काँग्रेस-राष्ट्रवादी कोणत्या प्रेरणेनं शिवसेनेसोबत गेली कळत नाही- गडकरी
मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय??- आदित्य ठाकरे
छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचा इतिहास दाखवाच, कारण…
Comments are closed.