बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझी पत्नी मला म्हणाली नाशिक किती…’; गडकरींनी सांगितला ‘तो’ खास किस्सा!

नाशिक | केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे आज नाशिकमध्ये एका कार्यक्रमसाठी उपस्थित होते. नाशिकच्या पंचवटीमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय थीम पार्कच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते. नाशिकमधील भाजप नगरसेविका प्रियंका माने यांच्या संकल्पनेतून या पार्कची निर्मिती करण्यात आली आहे.

नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात बोलताना बॉलिवूडचे शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांचा एक किस्सा सांगितला. आज मी आणि अमिताभ बच्चन एनडीटीव्ही च्या कार्यक्रमात होतो. त्यावेळी मला अमिताभ बच्चन म्हणाले की, तुम्ही फार तरूण दिसत आहात. मी त्यांना सांगितलं की, मी रोज एक तास प्राणायम करतो, असं गडकरी म्हणाले.

तसेच प्रदुषणमुक्त हवा मिळाली तर आपल्याला डॉक्टरांची गरज भासणार नाही, असं म्हणत गडकरींनी प्राणायामाचे महत्व सांगितलं आहे. पुढं बोलताना गडकरी म्हणाले की, माझी पत्नी विमानात सोबत होती. ती मला म्हणाली की, किती सुंदर शेती आहे. गोदावरी नदी सुंदर आहे. तसेच हवामान सुद्धा सुंदर आहे. नाशिक ग्रीन आणि सुंदर आहे, असंच राहावं असं गडकरींच्या पत्नीनं गडकरींना म्हणाल्या.

दरम्यान, आगामी 5 वर्षात आपण नागपूर शहर ध्वनी, जल आणि वायु प्रदुषणमुक्त करणार असल्याचं गडकरींनी बोलून दाखवलं आहे. तसेच प्रत्येक शहराच्या महापौर आणि आयुक्तांनी ठरवलं तर आपण पुढं जाऊ, असं गडकरींनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

ममता बॅनर्जींकडून पराभूत झालेल्या प्रियंका टिबेरवाल म्हणतात…’मीच या खेळाची मॅन ऑफ द मॅच…’

धोका वाढला! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्हयात कोरोनामुळे पुन्हा 61 गावांमध्ये कडक लॉकडाउन

भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल!

किंगखानच्या लेकाच्या अडचणीत वाढ! ड्रग प्रकरणात न्यायालयाने दिला हा निर्णय

“राष्ट्रवादीमध्ये आल्यावर भाजपमधील गद्दार कोण हे समजलं, टरबूज सर्च करा मग कळेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More