बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…जेव्हा नितीन गडकरी सामान्य माणसाप्रमाणे रांगेत उभे राहतात; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची उत्कृष्ट राजकीय नेता अशी ओळख आहे. संपूर्ण देशात नितीन गडकरींनी रस्ते विकासाची काम मोठ्या प्रमाणात केली आहेत. अशातच नितीन गडकरींच्या साधेपणाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विमान प्रवासासाठी नितीन गडकरी सामान्य माणसाप्रमाणे रांगेत उभे राहिल्याचं दिसत आहे.

नितीन गडकरींच्या या साधेपणामुळे समाज माध्यमांमधून कौतुकाचा वर्षाव होतोय. केंद्रीय मंत्री अशाप्रकारे रांगेत उभा असल्याचं खूप कमी प्रमाणात पहायला मिळतं. त्यातच एखाद्या राजकीय व्यक्तीकडे कुठलं महत्त्वाचं पद असेल तर सामान्य माणसाप्रमाणे त्यांना रांगेत थांबायची गरज पडत नाही. राजकीय नेत्याकडे केंद्रीय मंत्रीपद असेल तर सुरक्षेचा लवाजमा सोबत असतो. मात्र, नितीन गडकरी अत्यंत साधेपणाने वावरताना दिसत आहे.

नितीन गडकरींचा हा व्हिडीओ विमानात बसलेल्या एका प्रवाशाने शुट केला आहे. 17 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये विमान प्रवास करण्यासाठी रांगेत उभे थांबले आहेत. केंद्रीय मंत्र्याच्या पदानुसार त्यांना विशेष दर्जाची सुरक्षा दिली जाते. एक्स, वाय, झेड तसेच झेड प्लस सुरक्षा दिली जाते. परंतु, नितीन गडकरींच साधं राहणीमान पाहिल्यानंतर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, जोपर्यंत मंत्रीपद आहे तोपर्यंतच आपल्याला ही सुरक्षा दिली जाते. मंत्रीपद गेल्यानंतर आपल्याला कोणीही विचारत नाही, असं नितीन गडकरींनी म्हटलं होतं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नगर येथील कार्यक्रमात नितीन गडकरींवर कौतुकाचा वर्षाव केला होता. नितीन गडकरींचा आदर्श इतर लोकप्रतिनिधींनी घ्यायला हवा, असं शरद पवार म्हणाले होते.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

शिवसेनेच्या ‘या’ नेत्याच्या अडचणीत वाढ; ईडीकडून मोठ्या कारवाईची शक्यता

बहुप्रतिक्षित IPO बाजारात धडकणार! ‘या’ कंपनीबाबत केंद्र सरकार लवकरच मोठी घोषणा करणार

“मी बिग बॅासमध्ये गेल्यामुळे काही लोकांपर्यंत कीर्तन परंपरा पोहोचली”

वापरलेल्या मास्कची पायपुसणी, धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर महापालिकेची कारवाई!

“तृप्ती देसाई सुद्धा मला भिडताना विचार करुन भिडायच्या”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More