बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…त्यातून नागपूरने 325 कोटी कमवले, काहीच टाकाऊ नसतं-नितीन गडकरी

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एका कार्यक्रमात बोलताना ग्रीन हायड्रोजनविषयी मार्गदर्शन केलं. तसेच त्यांनी हायड्रोजन निर्मितीसाठीचा त्यांचा प्लॅन सांगितला. यावेळी बोलताना गडकरींनी नागपूर येथील एका प्रकल्पाची माहिती देखील दिली आहे.

नागपूर (Nagpur) येथे नितीन गडकरींच्या पुढाकाराने एका प्रकल्पाची सुरूवात करण्यात आली. गेल्या 7 वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. महाराष्ट्र सरकारच्या वीज प्रकल्पाला हे सांडपाणी विकलं जातं. हे सांडपाणी विकून नागपूरला तब्बल 325 कोटी रूपये मिळतात.

कोणतीही गोष्ट टाकाऊ नसते. नेतृत्वावर असणाऱ्या दृष्टीवर सगळं अवलंबून असतं, असं नितीन गडकरी या प्रकल्पाची माहिती देताना म्हणाले. तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तुम्ही कचऱ्यातून आर्थिक कमाई करू शकता. तर आता सांडपाण्यातून आर्थिक कमाई करता येते का हे पाहाणार असल्याचंही गडकरी म्हणाले.

दरम्यान, ग्रीन हायड्रोजनवर ट्रक, बसेस आणि कार चालवण्याचा माझा प्लॅन आहे, असंही नितीन गडकरी म्हणाले. शहरातील सांडपाणी आणि घनकचऱ्यापासून या ग्रीन हायड्रोजनची (Green Hydrogen) निर्मीती करता येणार असल्याची माहिती देखील नितीन गडकरींनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

ओमिक्रॉनची धास्ती; बुस्टर डोस घ्यायचा की नाही?; नीति आयोगाने दिली ‘ही’ माहिती

तेलंगणातून चिंता वाढवणारी बातमी समोर, तब्बल ‘इतके’ विद्यार्थी सापडले पॉझिटीव्ह

‘मी सीडी काढली तर…’; मलिकांच्या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

‘भारतासाठी पुढील 2 आठवडे महत्त्वाचे’; तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य

“अमरावतीत झालेला प्रकार संयोग नव्हे तर प्रयोग होता”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More