राजकारण्यांनी इतर क्षेत्रात हस्तक्षेप करु नये, साहित्य संमेलनात गडकरींचा सल्ला

राजकारण्यांनी इतर क्षेत्रात हस्तक्षेप करु नये, साहित्य संमेलनात गडकरींचा सल्ला

यवतमाळ | राजकारणाला मर्यादा आहेत, त्यामुळे राजकारण्यांनी इतर क्षेत्रात हस्तक्षेप करता कामा नये, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिला आहे. 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.

मतभिन्नता असण्यात काहीच हरकत नाही पण मनभेद असायला नको, असं सुचक वक्तव्यही त्यांनी केलं आहे.

राजकारण म्हणजे समाजकारण आणि विकासकारण असते. मात्र दुर्दैवाने आपल्याकडे त्याचा अर्थ सत्ताकारण असा घेतला जातो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जात नाही ती जात, जातीवाद आपल्या मागे लागला आहे. पण त्याला संपवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“ओबीसींना 10 टक्के आरक्षण वाढवून देऊन आरक्षणाची मर्यादा 75 टक्के करा”

-“राज्याच्या मंत्रीमंडळात एक तरी शेतकऱ्याचं पोरगं दिसतंय का”??

-“बच्चू भाऊ, या सरकारमध्ये दम नाही, दम आहे तो फक्त तुमच्यात”

-भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला की मोदी घरात बसणं पसंत करतात- राहुल गांधी

-“बीडचा खासदार निवडून द्या, RSS वाल्यांना कायमचं जेलमध्ये टाकतो”

Google+ Linkedin