“महाराष्ट्रात जातीयवाद सुरूये, माझ्या मतदारसंघात 40 टक्के दलित व मुस्लिम तरी मी निवडून येतो”

Nitin Gadkari | भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या स्पष्ट आणि रोखठोक वक्तव्यांसाठी प्रचलित आहेत. लोकसभेत गडकरी यांचा मोठा विजय झाला आहे. नागपूरमधून सलग तीन वेळा विजयी होऊन हॅट्रिक साधणारे गडकरी यांना मोदी सरकारमध्ये पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री पद मिळालं आहे. अशात त्यांनी भाजपच्या कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य करत त्यांनी पक्षाचे देखील कान टोचले. ”आपण तेच काम केले तर आपल्या येण्याचा फायदा काय? आपल्यात आणि काँग्रेसमध्ये वेगळेपण काय? भविष्यात काही चांगले करायचे असेल तर भूतकाळातल्या घटना आठवून वर्तमानात त्याचे चिंतन केले पाहिजे.”, असं गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले आहेत.

“..मग भाजप अन् काँग्रेसमध्ये वेगळेपण काय?”

गोव्यात पक्षाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. आपल्या पक्षात अनुकूल काळ आहे. ज्यावेळी शेतात हायब्रीड बियाणे लागते. तेव्हा उत्पन्न वाढते, पण जेवढे हायब्रीड बियाणे डेव्हलप होते तेवढे झाडावर रोगराई देखील वाढते. वाईट दिवसात आनंद होतो. मात्र चांगल्या दिवसात घर बरबाद होतात. समृद्ध आणि संपन्नतेच्या काळात सुख टिकवणे हे आवश्यक असते, असं गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले आहेत.

यावेळी गडकरी यांनी कॉँग्रेसवर देखील निशाणा साधला. “आपल्या पक्षात आपले जे संस्कार आहे ते शॉर्टकट नाहीत. लालकृष्ण आडवाणी नेहमी म्हणायचे, “वुई आर पार्टी विथ डिफरन्स” आपण तेच काम केले तर आपल्या येण्याचा फायदा काय?. आपले वेगळेपण आपण लक्षात ठेवले पाहिजे. जे काम आपण नाही करायला पाहिजे ते केले तर त्यांच्या जाण्यात फायदा नाही आणि आपल्या येण्यात फायदा नाही.”, असं म्हणत त्यांनी पक्षाचे कान टोचले.

“कोणताही व्यक्ती जातीने नव्हे तर गुणांनी मोठा असतो”

तसंच महाराष्ट्रातील विविध मुद्द्यावर देखील गडकरी (Nitin Gadkari) यांनी भाष्य केलं. “महाराष्ट्रात सध्या जातीयवाद खूप सुरू आहेत. मी बावनकुळे आणि फडणवीस यांना म्हटले की, या वादात आपली खूप अडचण होईल. पण मी ठरवून टाकले की आपण जातीवाद करायचा नाही. कुठलाही व्यक्ती हा जातीने मोठा होत नसतो, तो त्याच्या गुणांनी मोठा असतो. माझ्या मतदारसंघात 22 लाख मतदार आहेत. त्यात 40 टक्के दलित आणि मुस्लिम आहेत, तरी मी निवडून आलो.”, असं म्हणत गडकरी यांनी जातीय प्रश्नावर भाष्य केलं.

News Title- Nitin Gadkari statement on casteism

महत्त्वाच्या बातम्या-

“…तर मी आमदारकीची निवडणूक लढणार नाही”; बच्चू कडू यांची मोठी घोषणा

मुंबई, कोकणसह राज्यातील ‘या’ भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता

“माझ्यावर गुन्हा झाला तरी..”, विशाळगडावरील अतिक्रमाणाविरोधात संभाजी राजे आक्रमक

मुंबई पुन्हा तुंबणार?, पुण्यातही पावसाचं थैमान

ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा घटस्फोट निश्चित?, सोशल मीडियावर तो व्हिडीओ व्हायरल