नागपूर महाराष्ट्र

कार्यकर्त्यांमध्ये जात नसते, ज्याला तिकीट पाहिजे असतं त्यांना जात आठवते- नितीन गडकरी

संग्रहीत फोटो

नागपूर | कार्यकर्त्यांमध्ये जात नसते. पण ज्याला निवडणुकीत उमेदवारी हवी असते, तिकीट हवं असतं त्यांनाच जात आठवते, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लगावला आहे.

राज्यातील पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा घेताना जातीपातीच्या राजकारणावरुन विरोधकांवर टीका केली आहे.

लोक आपल्या सोयीसाठी जात पुढे करतात, मात्र त्यांनी जातीसाठी काय केलं हा मोठा प्रश्नच असतो, असंही गडकरी म्हणालेत.

माणूस जातीने मोठा नसतो, कर्तृत्वाने मोठा असतो. भाजप जातीपातीचं राजकारण करत नाही. भाजपमध्ये सगळ्याच जातीचे कार्यकर्ते आहेत. मी अनेक जणांचे ऑपरेशन केले, त्यांना आरोग्याची सुविधा दिली. ही मदत करताना कुणाचीही जात विचारली जात नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाचा भारतासमोर 389 रन्सचा डोंगर, स्टिव्ह स्मिथचं सलग दुसरं शतक 

राज ठाकरे, पवारांची चौकशी लागली, मग दानवे शुद्ध घीवाले आहेत काय?- बच्चू कडू

“पोपट घेऊन चंद्रकांत पाटील यांनी चिठ्ठ्या काढल्या; मात्र चिठ्ठ्यांची भविष्यवाणी खोटी ठरली” 

आता विनामास्क आढळण्यास थेट अटक होणार; ‘या’ राज्य सरकारचा निर्णय 

फेरीवाले आणि दुकानदारांची होणार कोरोना चाचणी; मुंबई महापालिकेचा निर्णय

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या