मुंबई | हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची सात दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. तिने आज सकाळी 6.55 वाजता अखेरचा श्वास घेतला. या घटनेवर महाराष्ट्रभरातून उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
समाज म्हणून ही घटना आपल्या सगळ्यांनाच मान खाली घालायला लावणारी आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.
हिंगणघाट येथील अमानुष कृत्याची बळी ठरलेल्या तरूणीला माझी भावपूर्ण श्रद्धांजली, असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय. या घटनेतील आरोपींवर सरकार कठोर कारवाई करेल हा विश्वास आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पुन्हा अशी घटना घडणार नाही याची सरकार आणि समाज दोघांनीही दक्षता घ्यायला हवी, असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
हिंगणघाट येथील अमानुष कृत्याची बळी ठरलेल्या तरूणीला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. समाज म्हणून ही घटना आपल्या सगळ्यांनाच मान खाली घालायला लावणारी आहे.या घटनेतील आरोपींवर सरकार कठोर कारवाई करेल हा विश्वास आहे.पुन्हा अशी घटना घडणार नाही याची सरकार आणि समाज दोघांनीही दक्षता घ्यायला हवी.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 10, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
आरोपीला फक्त 10 मिनीट आमच्या ताब्यात द्या; पीडितेच्या मामाची मागणी
आज ती जळाली नाही, समाजाचा व व्यवस्थेचा बुरखा जळाला- चित्रा वाघ
महत्वाच्या बातम्या-
कागदपत्रं मागितली तर छाती दाखवू, मारा गोळी- असदुद्दीन औवेसी
या सदस्याच्या निधनानं ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’वर शोककळा
ती आपल्यातून निघून गेली, पण नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी- देवेंद्र फडणवी
Comments are closed.