देश

क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं- नितीन गडकरी

नवी दिल्ली | महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर जोरदार टोलेबाजी करत क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी केलं आहे.

क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकतं. अनेकवेळा आपला पराभव होईल असं वाटतं पण अचानक चित्र पालटतं आणि निकाल तुमच्याबाजूनं लागतो, असं सूचक वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. तसेच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा शेवट काहीतरी वेगळा असेल, असं संकेत गडकरींनी दिले आहेत.

माझ्या मते सरकारं बदलत असली तरी विकासाचं धोरण बदलत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार कुणाचंही आलं तरी मोठ्या प्रकल्पांच्या बाबतीत कुणीच आडकाठी ठरेल असं वाटत नाही, असं मतही गडकरींनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, भाजप आणि शिवसेनेतील सत्तासंघर्षातून महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीखाली ढकलला गेला आहे. एकीकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागली असताना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपविरुद्ध एकत्र येऊन सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या