Top News

“फुकटचं दिलं तर लोकांना वाटतं गडकरींजवळ खूप हरामचा माल आहे”

Photo Credit- Nitin Gadkari Facebbok

नागपूर | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये झालेल्या रस्ते सुरक्षा कार्यक्रमात बोलताना तुफान फटकोबाजी केली. फुकटचं दिलं तर लोकांना वाटतं नितीन गडकरींकडे खूप हरामचा माल आहे, असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

नितीन गडकरी यांनी नागपूरच्या रस्ते सुरक्षा कार्यक्रमात बोलताना तुफान फटकेबाजी केली. लोकांना आतापर्यंत फुकटचं घ्यायची सवय लागलीय. आम्हीही आतापर्यंत द्यायचो. पण फुकटचं दिलं तर लोकांना वाटते गडकरींजवळ खूप हरामचा माल आहे. म्हणून आता कुणालाही फुकटंच देणार नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.

आपल्या देशात ड्रायव्हिंग लायसनस सहज मिळते. देशात 30 टक्के ड्रायव्हिंग लायसन्स बोगस निघाले, असं गडकरी म्हणाले. रस्त्यात वाहनं उभी केल्यास, त्याचा मोबाईल फोटो पाठवायला सांगणार. त्याचा अर्धा दंड फोटो काढणाऱ्याला आणि अर्धा दंड सरकारला देणार, असंही गडकरी म्हणाले. नागपुरातील अपघाताचे 61 पैकी 31 ब्लॅक स्पॅाट सुधारण्यात आले आहेत, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी काल पुण्यातल्या चांदणी चौकातील रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर बैठकीत त्यांनी कंत्राटी अधिकाऱ्यांचे चांगलेच कान उपटले. आम्ही ‘मालपाणी’वाले लोक नाही त्यामुळे काम व्यवस्थितच झालं पाहिजे, अशी तंबी त्यांनी या अधिकाऱ्यांना दिली.

थोडक्यात बातम्या-

“माढ्यातून निवडणूक लढण्याचा निर्णय मागे घेणाऱ्यांनी मला शिकवू नये”

‘पूजाने आत्महत्या केली नाही तर…’; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट!

घरकाम करणाऱ्या तरूणीसोबत पोलीस अधिकाऱ्याने केलं हे धक्कादायक कृत्य

“प्रियंका गांधी दुर्गेचा अवतार, त्यांच्या हातूनच भाजपचा वध होणार”

तो मरता मरता वाचला, म्हणतो टाटानेच केला चमत्कार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या