बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘उगाच कुणाच्या घरी जाऊ नका, त्यांच्याशी….’; गडकरींचा फडणवीसांना प्रेमळ सल्ला

नागपूर |  राज्यात कोरोनाने हाहाकार माजला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांना आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गडचिरोली दौरा केला. आवश्यक आहे जाणं पण त्यावेळी त्यांच्या गाडीत किती लोकं होती?, आता सर्व काम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने करा. प्रत्येकाकडे मोबाईल आहे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सोय आहे. उगाच कुणाच्या घरी जाऊ नका. त्यांच्याशी फोनवर संपर्क साधा. तुम्ही जेवढं लाईटली घेत आहात तेवढं हे साधं नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.

आता अन्य रस्ते, पुल, पक्षाची जी कामं असतील ती महत्वाची आहेतच. पण ती कामंही घरुन घरा. आता येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांना गमावणं हे आपल्याला परवडणारं नाही. ही पार्टी वगैरे जी काम आहेत ती महत्वाची आहेत. पण आधी आपला जीव वाचला तर पुढे काही करता येणार असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

नुसत्या निवडणुका लढवणं आणि सत्तेत जाणं एवढाच त्याचा भाग नाही, यावेळी गरिबांच्या मागे, समाजामागे धर्म, पक्ष विसरून मदत करा. त्याचे फळ पक्षाला नक्की मिळतं. वाईट काळात कार्यकर्त्यांच्या मागे राहिलो तर ते कधीच विसरत नाही, असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.

थोेडक्यात बातम्या- 

देशातील 3 राज्यांमध्ये मागच्या 24 तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही

‘स्तनपानाला अजुनही आपल्याकडे…’; मातृदिनानिमित्त अमृता रावने व्यक्त केली खंत

पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, बरे होणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली

“गडकरींकडे जबाबदारी देण्याचा सल्ला मानला असता तर कोरोना नियंत्रणात असता”

“कोरोनाच्या चितेत लोक जळत होते, तेव्हा पंतप्रधान प्रचारात मग्न होते”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More