नागपूर | आठ दिवसांमध्ये कामं पूर्ण केली नाहीत तर लोकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगेन, अशी तंबी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. या वक्तव्यामुळे नितीन गडकरी पून्हा एकदा चर्चेत आले आहेत.
नागपूरच्या एमएसएमई सेक्टरमध्ये लघु उद्योग भारतीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी याबाबत वक्तव्य केलं.
अधिकाऱ्यांनी कामे न केल्यास त्यांची लोकांना सांगून धुलाई करु अशी तंबी दिल्याचे त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना गडकरी यांनी लालफितीच्या कारभाराविषयीही नाराजी व्यक्त केली आहे.
आपल्याकडे लालफितीचा कारभार आहे. अनेक परिवहन निरीक्षक लाच घेतात. मी त्यांना सांगू इच्छीतो की तुम्ही सरकारी नोकर आहात आणि मी लोकांमधून निवडून आलोय. त्यामुळे मी लोकांना उत्तर देण्यास बांधील आहे, असं गडकरी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-बिग बॉसच्या घरातील ‘हा’ स्पर्धक बाहेर!
-“नेहरू-गांधी परिवाराशिवाय काँग्रेस चालवणं कठीण आहे
-“जेएनयू विद्यापीठाला मोदींचं नाव द्या, मोदींच्या नावावरही काहीतरी असावं”
-राधाकृष्ण विखे पाटील यांना मातृशोक; सिंधुताई विखेंचं वृद्धापकाळाने निधन
-लग्नसोहळ्यात आत्मघाती बॉम्बस्फोट; 40 जणांचा जागीच मृत्यू
Comments are closed.