बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कदाचित मी पहिलाच मंत्री असेल ज्याने…”, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा

मुंबई | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे केंद्र सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात. मागील काही वर्षात त्यांनी अनेक प्रकल्प (Projects) पूर्ण देखील करून घेतले आहेत. अनेक कार्यक्रमात गडकरी अनेक मजेशीर किस्से, जुन्या आठवणी सांगत असतात. अशातच आता एका कार्यक्रमात देखील गडकरींनी एक अफलातून किस्सा सांगितला आहे.

1994 साली जेव्हा मी नवीन मंत्री झालो होतो. त्यावेळी आम्ही गुंतवणूकदारांकडे जात होतो. आता गुंतवणूकदार आमच्याकडे येतात. 94 ला माझ्याकडे नवीन टीव्ही आला होता. त्यावेळी मी सार्वजनिक बांधकाम मंत्री होतो. मी पुण्याच्या एका दुकानात गेलो आणि दुकानदाराला म्हटलं की मला इन्स्टाॅलमेंटवर टीव्ही द्या. इन्स्टाॅलमेंटवर टीव्ही घेणारा कदाचित मी पहिलाच मंत्री असेल, असं गडकरी या कार्यक्रमात म्हणाले.

दुकानदाराला समजलं की मंत्री आहे, तेव्हा तो म्हणाला की, साहेब नवीन पीस आला की देतो. तो टीव्ही मला काही मिळाला नाही, असंही गडकरींनी सांगितलं. त्यावेळी मी विचार केला, जर टीव्ही इन्स्टाॅलमेंटवर मिळू शकतो तर मग रस्ते का नाही? त्यानंतर मी इन्स्टाॅलमेंटवर पहिला ठाणे भिवंडी बायपास रोड बनवला, असं गडकरींनी सांगितलं आहे.

दरम्यान, देशात जनसंख्या आणि ऑटोमोबाईल ग्रोथ या दोन गोष्टींवर फार प्रयत्न करावा लागतो. प्रोजेक्ट वाढत आहे. त्यामुळे ग्रोथ देखील होत आहे. आता लोकांना रोडमार्गे दिल्ली ते मुंबई केवळ 12 तासात जाता येईल, असंही गडकरींनी या कार्यक्रमात सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“हिंदवी स्वराज्य आणि हिंदूवी स्वराज्य या शब्दांचा अर्थ भाजपला कळत नाही”

“युतीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून प्रस्ताव”, राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

OBC Reservation! निवडणूक आयोगाचा ठाकरे सरकारला मोठा दणका

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

खुशखबर! ‘या’ वर्षात कोरोना नष्ट होणार; WHOच्या संशोधकांचा दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More