Nitin Gadkari | दिल्लीत आज (9 जून) नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील एनडीएच्या अनेक खासदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.
महाराष्ट्रातून सर्वात अगोदर भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. नागपूरमधून सलग तीन वेळा विजयी होऊन हॅट्रिक साधणारे गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
नितीन गडकरी यांनी भूषविले तिसऱ्यांदा मंत्रीपद
2014 मध्ये त्यांनी प्रथम नागपूरमधून लोकसभा निवडणूक जिंकली व त्यात त्यांनी काँग्रसचे दिग्गज नेते विलास मुत्तेम वार यांचा तब्बल 2 लाख 86 हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर 2019 मध्येही गडकरी नागपूरमधून विजयी झाले.
पहिल्यांदाच लोकसभा गाठणाऱ्या गडकरी यांना मोदी यांनी मंत्रिमंडळातही स्थान दिले. तसंच मोदी-2 च्या मंत्रिमंडळातही गडकरी यांना संधी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा म्हणजेच तिसऱ्यांदा गडकरी (Nitin Gadkari ) यांना मंत्रीमंडळात संधी मिळाली आहे.
महाराष्ट्रातून ‘यांना’ मिळाली संधी
दरम्यान, महाराष्ट्रातून भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना पहिल्यांदाच संधी दिली आहे. तर, नितीन गडकरी, पीयूष गोयल, रामदास आठवले यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
News Title- Nitin Gadkari took oath as Minister for third time
महत्त्वाच्या बातम्या-
‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी…’; सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचं मोठं वक्तव्य, म्हणाला…
“थोडे दिवस धीर ठेवू, सर्वांना एकमेकांची गरज”; प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य
“मस्ती आहे का?,ज्या दिवशी नरड्याला लागेल..”; मनोज जरांगेंचा नाव न घेता धनंजय मुंडेंना इशारा
गर्भवती महिलेला कारने दिली धडक, भयंकर अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर