बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उत्पादन वाढवा मार्केट निर्माण करण्याची जबाबदारी माझी”, गडकरींचं शेतकऱ्यांना आवाहन

लातूर | लातुर येथे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Transport Minister Nitin Gadkari) यांनी लोदगा येथील ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्युटचे उद्धाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर लातूर येथील आयोजित सभेत नितीन गडकरींनी इथेनॉलचे (Ethanol) महत्त्व शेतकऱ्यांना सांगितले आहे.

इथेनॉलचे उत्पादन शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरही टाकते आणि त्यामधून रोजगारही उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल उत्पादित न करता इथेनॉल निर्मित आधारित शेती करणे आवश्यक आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या ऐवजी आता इथेनॉलचा वापर ही काळाची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

इथेनॉल प्रक्रियाकृत मक्यापासून बनते. इथेनॉल हे अनावश्यक गॅसोलिनपेक्षा कमी हानिकारक आहे याचा अर्थ स्थानिक शेती आणि उत्पादन अर्थव्यवस्थांना मदत करते. या कारणामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकावर आधारित न राहता ज्याची मागणी आहे, त्याचीच उत्पादकता करणे आवश्यक आहे, असं नितीन गडकरींनी सांगितलं आहे.

दरम्यान, सर्व प्रकारच्या बायोगॅसपासून इथेनॉल तयार करता येते. इथेनॉल हा एक कमी किंमतीचा पर्यायी इंधन आहे. जे कमी प्रदुषण आणि अधिक उत्पादकता देते. इथेनॉल, इलेक्ट्रीक कार, सीएनजी यांसारख्या निर्मितीसाठी कच्च्या मालाचा पुरवठा हा शेतकरीच करू शकतो, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. उत्पादन वाढवा मार्केट निर्माण करण्याची जबाबदारी ही माझी, असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“हिंदुंची मंदीरं तोडली जाणार असतील तर आम्ही…”; भाजप आमदाराचा इशारा

महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारीबाबत ‘ही’ माहिती आली समोर, वाचा एका क्लिकवर

मुख्याध्यापकाचं निलंबन मागे घ्या; 521 विद्यार्थी आझाद मैदानावर काढणार मोर्चा

24 तासाच्या आत फासा पलटला, ‘तो’ ताज पुन्हा अंबानींच्या डोक्यावर!

मुंबईतील आजची कोरोनाबाधितांची आकडेवारी अत्यंत दिलासा देणारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More