बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नितीन गडकरींचं काँग्रेसबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (Congress) पक्षाचा दारूण पराभव झाला. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (AAP) काँग्रेसला जोरदार धक्का दिला. यानंतर येत्या काळात काँग्रेसची जागा आप घेईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. या चर्चांना उधाण आलं असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काँग्रेसबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

काँग्रेस पक्ष कमी हेत असताना त्यांची जागा प्रादेशिक पक्ष घेत आहे आणि काँग्रेसची जागा प्रादेशिक पक्षाने घेणं लोकशाहीसाठी चांगलं नाहीये, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. एका मुलाखतीत त्यांना विरोधक आणि लोकशाही यावर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना नितीन गडकरींनी काँग्रेसबद्दल मत व्यक्त केलं.

लोकशाही ही सत्ताधारी पक्ष आणि विरोधक अशा दोन चाकांवर चालते. सक्षम विरोधक ही लोकशाहीची गरज आहे. त्यामुळे मला मनापासून असं वाटतं की काँग्रेस पक्ष मजबूत व्हावा, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत बोलताना केलं आहे.

दरम्यान, प्रत्येकाला संधी मिळत असते. त्यामुळे निराश होऊन पक्ष आणि विचारधारेला न सोडता काम करत राहिलं पाहिजे. एक दिवस पराभव होत असेल तर एक दिवस विजय देखील होईल, असं वक्तव्य देखील नितीन गडकरी यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ कायम, सलग सहाव्यांदा पेट्रोल महागलं; वाचा ताजे दर

ipl 2022: हार्दिकची गुजरात टीम राहुलच्या लखनौवर भारी, रंजक सामन्यात गुजरातचा दणदणीत विजय

पैसा वसूल शेअर! वर्षभरात तब्बल 184 टक्क्यांनी वाढला ‘या’ कंपनीचा शेअर

“…अन् राष्ट्रवादीचा सदस्य आमच्या छातीवर नाचतो”; शिवसेना आमदाराचं वक्तव्य

मोठी बातमी! ठाकरे सरकारच्या दोन मंत्र्यांवर मुंबईत गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More