मुंबई | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) नेहमीच चर्चेत असतात. रस्ते-वाहतूकीसाठी अनेक योजना ते घेऊन येत असतात. नुकताच 2023-24 च्या आर्थिक संकल्प सादर करण्यात आला. यावरच बोलताना नितीन गडकरींनी एक वक्तव्य केलं आहे. याचमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प (Budget) हा 2024 च्या निवडणुकीचे लक्ष्य ठेवून करण्यात आला आहे अशी चर्चा सुरु आहे. याविषयीच बोलताना, प्रत्येक नेता निवडवणूक डोळ्यासमोर ठेवत असतो. निवडणुकीचाच विचार करतो, आम्ही देखील तेच करत आहोत. आम्ही काही साधू-संत नाही. असं वक्तव्य त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केलं आहे.
2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर नितीन गडकरींनी आपलं मत व्यक्त केलं तेव्हा ते म्हणाले,”आम्ही पूजा-पाठ करण्यासाठी नव्हे, तर निवडणूक (Election) जिंकण्यासाठी आलो आहोत. चांगल काम केल्यानंतर निवडणूक जिंकू.”
गडकरींना निवडणुकीचं लक्ष्य काय हे विचारल असता, मी निवडणुकीचं लक्ष्य ठेवून कधीच काही करत नाही. मी कधी निवडणुकीचा विचार करत नाही. बोलताना देखील मी कधी विचार करत नाही. काम करत राहिलं पाहिजे हेच माझं लक्ष्य आहे. सगळे रस्ते 2024 पर्यंत अमेरिकेसारखे (America) करणं हे माझं लक्ष्य आहे, असं देखील ते पुढे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- भारीच की! Valetine’s Day दिवशी iPhone वर मिळेल मोठा डिस्काउंट
- “केलेले आरोप सिद्ध करुन दाखवा नाही तर राजकीय संन्यास घ्या”
- आश्चर्यकारक! आता गाय दिवसाला 150 लीटर दूध देणार
- चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये मोठा ट्वीस्ट!
- कंगणा चांगलीच भडकली; थेट घरी येऊन मारण्याची दिली धमकी