बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी राज्यात मंत्री असतो तर मुंबईत…’; नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

मुंबई | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नुकतंच एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात नितीन गडकरींनी चौफेर मुद्द्यांवर भाष्य केलं. तर मुंबईतील वाहतूक कोंडीबद्दल बोलताना नितीन गडकरींनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नितीन गडकरींनी मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तीन मजली उड्डाणपुलाचा पर्याय सुचवला आहे. मी राज्याचा मंत्री असतो तर मुंबईमध्ये तीन मजली उड्डाणपूल बनवला आसता, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. तर मुंबईत लोकसंख्या वाढल्याने वाहतूक समस्या निर्माण झाल्याचंही गडकरी म्हणाले.

माहिमच्या उड्डाणपूलावरून येताना मी ट्रॅफिक जॅम मध्ये फसलो, त्यामध्ये 20-25 मिनीटे गेली. 1995ला राज्यात सत्ता असताना मी मंत्री होतो, त्यावेळी मी अनेक उड्डाणपूल बांधली. ते नसते तर कार्यक्रमात पोहोचायला आणखी एक तास उशीर झाला असता, असंही गडकरी म्हणाले.

दरम्यान, मुंबईत वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याने तीन मजली उड्डाणपूल आवश्यक असल्याचं नितीन गडकरी म्हणाले. पहिल्या तीन मजल्यांवर रस्ते असतील आणि त्यावर मेट्रो असेल, असा पर्याय नितीन गडकरी यांनी सूचवला आहे.

थोडक्यात बातम्या-

“ईडी आहे की घरगडी आहे हेच कळत नाही”

“तुम्हाला सत्ताच हवीय ना, मी तुमच्यासोबत येतो, टाका मला तुरुंगात”

शिवसेना नेत्याचे प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप, म्हणाले…

होय आम्ही अपयशी ठरलो!; भर सभागृहात शिवसेनेच्या मंत्र्याची कबुली

“आमदारांच्या दाढ्यांना हात लावून हे सरकार चाललं आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More