Top News पुणे महाराष्ट्र

पुणे-नगर-औरंगाबाद रस्त्याबाबत नितीन गडकरी यांची आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा

पुणे | पुणे ते औरंगाबाद डायरेक्ट अ‍ॅक्सेस रोड होणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. नितीन गडकरी हे आज पुणे दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुणे ते औरंगाबाद डायरेक्ट अ‍ॅक्सेस रोड झाल्यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे, असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

पुणे मुंबई वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे. त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, गुजरात या राज्यातून थेट दक्षिणेतील हैदराबाद, बेंगलोर,त्रिवेंद्रम आणि चेन्नई अशा चार दिशांना जाणारी ट्रॅफिक खूप मोठी आहे. त्यामुळे आम्ही मुंबई ते दिल्ली अशा या बारा लेनच्या महामार्गाचं काम सुरु आहे. त्यामुळे मुंबई-दिल्लीपर्यंत अंतर 12-13 तासांत कापता येईल, असं गडकरी म्हणाले.

दरम्यान, चांदणी चौक तसेच कात्रज रस्ता यासाठी 400 कोटी रुपये बांधकामावर खर्च करण्यात येणार आहे. या रस्त्याबाबतच्या इतर अडचणी दूर केल्या आहेत. फक्त यासाठी थोडा जास्त वेळ लागतोय, तो कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असंही नितीन गडकरी म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

“…तर मग आम्हाला आमदार राम कदम यांच्यापर्यंत जावं लागेल”

‘या’ प्रसिद्ध मॉडेलची निघृण हत्या, मृतदेहासोबत केलं हे धक्कादायक कृत्य

पूजा चव्हाण प्रकरणी विजय वडेट्टीवार यांचं अजब वक्तव्य, म्हणाले…

‘राहुल गांधी यांनी आता लग्न करायला हवं’; केंद्रीय मंत्र्याच्या गांधींना सल्ला

पूजा चव्हाण प्रकरणी शिवसेना आक्रमक; संजय राठोडांना दिले ‘हे’ सक्त आदेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या