बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डिझेलवर चालणाऱ्या गाड्या बंद होणार?, नितीन गडकरींची वाहन उत्पादकांना मोठी सूचना

नवी दिल्ली | देशातील वाढती लोकसंख्या त्यामुळे वाढणारी गाड्यांची संख्या आणि दिवसेंदिवस मर्यादेपेक्षा जास्त प्रदुषण होत आहे. मागील एका सर्वेक्षणात जगातील सर्वात जास्त 10 प्रदुषित शहरांच्या यादीत भारतातील राजधानीसह तीन शहरांचा समावेश होता. प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेता, डिझेल गाड्यांचे उत्पादन आणि विक्री बंद करण्याच्या सूचना केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन उत्पादक कंपन्यांना दिल्या आहेत.

ऑटो उद्योगाची संघटना असलेल्या सियामच्या वार्षिक परिषदेच्या कार्यक्रमास नितीन गडकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात संबोधित करताना गडकरी म्हणाले की, केंद्र सरकार फ्लेक्झीबल सिस्टीमवाल्या इंजिनास प्रोत्साहन देण्यासाठी कटीबद्ध आहे. ज्यामुळे ग्राहकांना 100 टक्के पेट्रोल आणि 100 टक्के बायो- इथेनाॅलवर चालणाऱ्या वाहनांचा पर्याय देण्यात येईल.

मी वाहन उत्पादकांना डिझेल इंजिन वाहनांचे उत्पादन आणि विक्री डिसकरेज करण्याचे आवाहन करतो. डिझेलमुळे होणारे प्रदुषण हे मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आणि पर्यावरणासाठी घातक आहे. उद्योगांनी पर्यायी इंधन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच यासाठी संशोधनासह विकासावर खर्च केला पाहिजे, असं गडकरी म्हणाले.

उद्योगांनी ई-20 ला अनुकूल वाहने वेगाने विकसीत करण्याची आशा आहे. ई-20 वाहनात 20 टक्के इथेनाॅल आणि 80 टक्के पेट्रोल यांचे मिश्रण असते. यामुळे आयात बील कमी होईल, तसेच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल. ऑटोमोबाईल क्षेत्राचं जीडीपीतील योगदान 7.1 टक्क्यावरून 12 टक्क्यांपर्यत वाढायला हवं. रोजगार निर्मिती साडेतीन कोटी वरून पाच कोटी पर्यत जायला हवी, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, सपना चौधरीनंतर ‘या’ डान्सरची वाढतेय क्रेझ!

महाराष्ट्र काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर… ‘या’ नेत्यांचा झाला समावेश

अवघ्या 30 वर्षाच्या तरुणीचा ‘टीम नाना पटोले’मध्ये समावेश, पाहा कोण आहे ती?

मोठी खलबतं… अखेर पुणे काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची निवड

धोका वाढतोय! मुंबईत आजही कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ, वाजा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More