बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नितीन नांदगावकरांनी निर्णय घेण्यात घाई केली”

ठाणे | नितीन नांदगावकरांनी निर्णय घेण्यात खूप घाई केली. त्यांना भविष्यात याची नक्की जाणीव होईल, असं वक्तव्य ठाणे-पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष व ठाणे शहराचे मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी केले आहे.

मनसे स्टाईल खळ्ळ खटॅक आंदोलनामुळे प्रसिद्ध असलेले मनसेचे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. यावरुन अविनाश जाधव यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नांदगावकर पक्षाचा एक चांगला कार्यकर्ता होता. मात्र, त्यांनी निर्णय घेण्यात खूप घाई केली. त्यांना काही अडचणी होत्या तर त्यांनी राज ठाकरेंशी चर्चा करायला हवी होती, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आजूबाजूला असणाऱ्या बडव्यांमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला, असं स्पष्टीकरण नांदगावकर यांनी दिलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More