बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्यांना दिलासा; उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

मुंबई | कृषिपंप वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलासा आहे.  शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषिपंप वीज जोडणी अर्जावर तात्काळ कार्यवाही करून प्रलंबित अर्जांची संख्या शून्य करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे कृषिपंपाना वीज जोडणी देण्याबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत नितीन राऊतांनी वीज जोडण्या देण्यासाठी महावितरणाद्वारे राबवण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेतला.

शेती व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे, शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे, हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. शेतीला उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला पाहिजे हे उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेऊन नवीन कृषिपंप धोरण व अपारंपरिक ऊर्जा धोरण तयार करण्यात आले आहे. आता मागेल त्या शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यासाठी वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यासाठी पुरेसे वीज उपकेंद्र आणि रोहित्रे उभारण्यात येणार आहे, असं नितीन राऊत यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी सौर ऊर्जा धोरण राबवण्यात येत असून अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात सर्वच शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज उपलब्ध होणार आहे, असंही राऊतांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

वास्तव नाकारून चालणार नाही, लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध गरजेचे आहेत- शरद पवार

पत्नीने सासरी परत येण्यास दिला नकार, त्यानंतर नवऱ्याने जे केलं त्याने पुणे हादरलं

वाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री!

राज्यातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज!

“कडवट शिवसैनिक दुसरं काहीही करेल पण बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More