बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तेव्हा भाजप सत्तेत असती तर काश्मीर, जूनागढ, हैद्राबाद संस्थानांना पाकिस्तानला जा असं…”

मुंबई | सध्या देशासह महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच पेटलं असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. सध्या राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपवर ट्विटरवरून केलेल्या टीकेचीच चर्चा रंगली आहे.

‘1947 ला भाजप जर सत्तेत असती तर काश्मीर, जुनागढ आणि हैदराबाद या भारतामध्ये सामील व्हायला इच्छुक नसलेल्या संस्थांनाना भाजपच्या भक्तांनी पाकिस्तानला जायला सांगितलं असतं का?’, असा प्रश्न महाराष्ट्राचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विचारत भाजपवर निशाणा साधल्याचं ट्विटरवर आज पाहायला मिळत आहे.

नितीन राऊत यांनी केलेल्या ट्विटचीच सर्वत्र चर्चा रंगली असून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू आहेत. सध्या भाजपवर टीकेची एकही संधी महाविकास आघाडीचा एकही नेता सोडत नसतानाच नितीन राऊतांनीही आता यामध्ये उडी घेतली असून ट्विटरवरून खोचक टीकेचे बाण सोडले आहेत.

दरम्यान, नितीन राऊत हे कायमच आपल्या टीकेमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. काही वेळापुर्वीच राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यांनी नवाब मलिक उर्दूत नाव लिहितात म्हणून भक्तांना पोटशूळ उठलाय, असा घणाघाती हल्ला भाजपवर केला होता. त्यानंतर आता नितीन राऊतांनीही भाजपवर हल्लाबोल चढवला आहे.

 

थोडक्यात बातम्या

स्वत:चा अपघात होऊनही रविकांत तुपकरांनी जखमींना केली मदत

अमरावतीकरांसाठी बाजारपेठा सुरू पण संचारबंदीचे ‘हे’ नियम मात्र कायम

नवाब मलिक उर्दूत नाव लिहितात म्हणून भक्तांना…; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

भररस्त्यात मुलीने मारल्याने व्हायरल झालेल्या लखनऊच्या कॅब चालकाचा मोठा निर्णय

“किती मर्डर पचवणार हे सरकार?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More