बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदी पाठीवर दंडे खातील पण तरूणांना रोजगार देणार नाहीत- नितीन राऊत

मुंबई | पंतप्रधान मोदी 6 महिने सूर्यनमस्कार करून आपली पाठ मजबूत करतील पण देशातल्या तरूणांना रोजगार देणार नाहीत, असा खोचक टोला महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे.

देशात बेरोजगारी एवढी वाढली आहे की देशातील तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक दिवस लाठ्यांनी मारतील, असं वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यावर मी सूर्यनमस्कार घालून आणि व्यायाम करून माझं शरीर फिट करून घेतो, अशी मिश्किल टिप्पणी मोदींनी गुरूवारी लोकसभेत केली होती.

दुलरीकडे लोक दंडे मारणार असले तरी  मी सहा महिन्यात सूर्यनमस्कार करून स्वतःला दंडाप्रुफ करून घेईन, असं मोदी म्हणालेत.

दरम्यान, नवी दिल्लीमध्ये प्रचारसभेत बोलताना देशातल्या बेरोजगारीवर भाष्य करताना राहुल यांनी मोदींना लक्ष्य केलं होतं. त्यांच्या टीकेवर आज संसदेत भाजप खासदारांनी जोरदार गदारोळ घातला.

 

ट्रेंडिंग बातम्या-

गणपतीच्या रांजणगावमध्ये अभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाड

हिंगणघाटच्या पीडितेचा संपूर्ण खर्च मी उचलतो- आनंद महिंद्रा

महत्वाच्या बातम्या-

धर्मामुळे माणूस राक्षस नाही तर देव होण्याच्या मार्गाने जातो- मोहन भागवत

अण्णांचा मौन सोडण्यास नकार; सर्वाधिक दिवस मौनाचा विक्रम मोडला!

शेतकरी कर्जमाफी म्हणजे तात्पुरती मलमपट्टी- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More