महाराष्ट्र मुंबई

…म्हणून अवघ्या काही तासात मंत्री नितीन राऊत यांचा बंगला बदलला!

मुंबई | काँग्रेस नेते आणि मंत्री नितीन राऊत यांचा अवघ्या काही तासात बंगला बदलला आहे. याआधी राऊत यांना चित्रकूट बंगला देण्यात आला होता. मात्र आता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना चित्रकूट बंगला दिला गेला आहे. तर राऊतांना पर्णकुटी हा बंगला देण्यात आला आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात येणारा वर्षा हा बंगला उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार आहे. तसेच शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे रॉयलस्टोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील यांना सेवासदन बंगला देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांना समुद्रकिनारी असलेला ‘रामटेक’ बंगला देण्यात आला आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल मधील ‘सागर’ या शासकीय बंगला देण्यात आला आहे. आज फडणवीस वर्षा बंगला सोडतील.

दरम्यान, नितीन राऊतांना अवघ्या काही तासात बंगला बदलावा लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या