Top News ठाणे मुंबई

…म्हणून मुंबई, ठाण्यातील भागांत रात्रीपर्यंत वीज नव्हती- नितीन राऊत

मुंबई | वीज वाहिनीतील बिघाडामुळे सोमवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. दरम्यान संध्याकाळपर्यंत केवळ 6.-70 टक्के भागात वीजपुरवठा सुरळीत झाला.

ठाणे आणि मुलुंड परिसरात रात्रीपर्यंत वीज पुरवठा खंडित होता. यावर उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “मुलुंड, ठाणे, नवी मुंबईतील काही भागांमध्ये वीजपुरवठा सुरळीत झालेला नाहीये. मात्र रात्री दहापर्यंत तो होईल. सध्या मुंबईतील 2100 मेगावॅट गरज पूर्ण केली जातेय.”

आमचे कर्मचारी मुलुंड, ठाणे, नवी मुंबई आणि मालाडमधील काही भागांमध्ये खंडित असणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. टाटाकडून वीज निर्मीती सुरु झाली आहे. मी स्वत: या कामावर लक्ष ठेऊन आले, असंही राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

मुलुंडमधील अपेक्स रूग्णालयाला आग, एका रूग्णाचा मृत्यू

दिल्ली कॅपिटल्सचा मोठा धक्का! दुखापतीमुळे ‘हा’ खेळाडू स्पर्धेबाहेर

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शेतीतलं काही कळत नाही”

“मराठा समाजाची माफी मागा, अन्यथा तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या