Top News महाराष्ट्र मुंबई

पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला द्यावा; आणखी एका काँग्रेस नेत्याचा शरद पवारांना टोला

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना चीन-भारत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जरा सबुरीचा सल्ला दिला होता. त्यावरून काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी पवारांना टोला लगावला आहे.

नितीन राऊत म्हणाले, ” यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री होते तेव्हा इंदिराजी गांधींनी 1971 चं युद्ध जिंकलं होतं, पण हे शरद पवारांना आठवलं असते तर बरं झालं असतं.

“पवार हे काँग्रेसमध्ये तयार झालेलं नेतृत्व आहे. त्यांच्या मनात काँग्रेसबद्दल आपुलकी आहे, पण मग राहुल गांधींबद्दल ते तसं कोणत्या संदर्भात बोलले याबाबत माहिती नाही. खरं तर पवार यांनी नरेंद्र मोदींना प्रसार माध्यमांना सामोरं जायचा सल्ला द्यायला हवा होता”

1962 च्या युद्धावेळी असलेली परिस्थिती वेगळी होती, देश शस्त्र  सज्ज होता. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. ते संरक्षण मंत्री असताना त्यांनी काही चुका दुरुस्त केल्या असत्या तर बरं झालं असतं, असंही नितीन राऊत म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

अ‍ॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

तब्बल 1 कोटी लोकांची शिवभोजन थाळीने भागवली भूक, मुख्यमंत्र्यांकडून यंत्रणेचं कौतुक

महत्वाच्या बातम्या-

या कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी राज्य शासनाची रेल्वे मंत्रालयाला विनंती

या विभागातील कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा लागू, मंत्री गुलाबराव पाटलांची घोषणा

नाशिकमध्ये कडक लॉकडाउन, पालकमंत्री छगन भुजबळ यांचा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या