नागपूर महाराष्ट्र

आमचं चुकलं असेल तर माफ करा, पण…- नितीन राऊत

नागपूर | भाजपच्या काळात मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढली होती. त्याचा परिणाम आता दिसत आहे. जुनी थकबाकी दाबण्यासाठीच भाजप आंदोलन करत असल्याची टीका उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.

वीज बिल भरलंच नाही तर वीज निर्मिती कशी होणार?, असं म्हणत नितीन राऊत यांनी जनतेला विजबील भरण्याचं आवाहन केलं आहे.

भाजप आणि केंद्र सरकारच्या असंवेदनशील वागण्यामुळे महावितरण अडचणीत आहे. ग्राहक हा आमच्यासाठी देवासारखा आहे. आमचं चुकलं असेल तर माफ करा. पण वीज वापरली असेल तर बिल भरावंच लागेल, अशी हतबलताही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

कोरोना काळात 24 तास वीज पुरवठा करण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केल्याचा दावा नितीन राऊत यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘गावी सोडलेले आजोबा परत आले’; राकेश टिकैत यांनी 92 वर्षीय शेतकऱ्याला खांद्यावर घेतलं उचलून

“फडणवीसांच्या काळात देशात पेट्रोल डिझेलची सर्वाधिक किंमत महाराष्ट्रात होती”

“मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे जगात भारताची नाचक्की होतीये”

आपल्याला आपल्या कर्माची फळं मिळत असतात- पंकजा मुंडे

“आपल्या बापजाद्यांनी जिथं त्यांचं ‘गरम रक्त’ सांडलं त्या गडकिल्ल्यांवर मुलांना न्यायला विसरू नका”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या