महाराष्ट्र मुंबई

“बावनकुळेंनी इतकंच भारी काम केलं तर मग त्यांचं तिकीट का कापलं?, हे कसले चौकीदार हे तर थकबाकीदार”

मुंबई | चंद्रशेखर बावनकुळेंचा अभ्यास इतकाच चांगला असेल, त्यांनी इतकंच भारी काम केलं असेल, तर मग त्यांना तुम्ही विधानसभेला तिकीट का नाही दिलं?, असा सवाल ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी केला आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

भाजपनं जीएसटी थकबाकीच्या वसुलीसाठी आंदोलन केलं पाहिजे. हे म्हणतात आम्ही चौकीदार आहोत. हे कसले चौकीदार हे तर जीएसटीचे थकबाकीदार आहेत, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही, असं म्हणत नितीन राऊतांनी भाजपवर निशाणा साला आहे.

हे गरिबांचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे, जनतेनं निवडून दिलेलं सरकार आहे. मागच्या सरकारनं कर्जाचा डोंगर उभा करून ठेवलेला आहे. त्यामुळे आजची परिस्थिती वीजबिल माफीसारखी नाही. भाजपचं हे पाप आहे, अशी टीका नितीन राऊतांनी भाजपवर केली आहे.

28 हजार कोटी रुपये केंद्र सरकारचं देणं आहे. केंद्रानं ते पैसे दिल्यास आम्ही कधीही वीजबिल माफी करायला तयार आहोत, असं नितीन राऊत यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“तीन दिवसांत वीज बिलात सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू

वीज ग्राहक आमचा देव आहे, त्यांचे आम्ही नुकसान करणार नाही- नितीन राऊत

…तर ठाकरे सरकार काय फक्त गोट्या खेळायला बसलंय का?- निलेश राणे

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट महागात पडेल- राजेश टोपे

राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या