Top News आरोग्य कोरोना नागपूर महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितीन राऊत यांनी घेतला ‘हा’ स्तुत्य निर्णय

Photo Credit- Facebook/ Dr.Nitin Raut

नागपूर | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. तसेच कोरोनाचे नियम सर्वांनी पाळावेत अशा सूचना सरकारने केल्या आहेत. या सुचनांमध्ये विवाह समारंभाला 50 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आपल्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित स्वागत समारंभ स्थगित केला आहे. राऊतांनी त्या संदर्भातील पत्रक जारी केलं आहे.

आमचे चिरंजीव आयुष्यमान कुणाल आणि आयुष्यमती आकांक्षाचा विवाह 19 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला आणि विवाह स्वागत समारंभ उद्या 21 फेब्रुवारीला नागपूर इथे आयोजित केला होता. मात्र, नागपुरातील कोरोनाची वाढती स्थिती पाहता हा सोहळा तूर्तास स्थगित करून कोरोना प्रसार रोखण्यासाठी हातभार लावण्याचा निर्णय आम्ही राऊत कुटुंबीयांनी घेतला आहे. आपणांस ह्या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं. तरी हे निमंत्रण रद्द समजण्यात यावं आणि कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आपण कृपया आम्हाला सहकार्य करावं ही नम्र प्रार्थना. आपणांस होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही व्यक्तिशः दिलगीर आहोत, असं पत्रक नितीन राऊतांनी प्रसारित केलं आहे.

कोरोनाच्या त्री-सूत्री म्हणजे मास्क लावणं, सॅनिटायझरने हात धुणं, सुरक्षित अंतर ठेवणं इत्यादी बाबींचे पालन करावे अशी विनंती देखील राऊतांनी या पत्राद्वारे नागरीकांना केली आहे.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी देखील त्यांची मुलगी मुलगी पायल चव्हाण हिच्या लग्नानिमित्त आयोजित स्वागत समारंभ रद्द केला होता.

थोडक्यात बातम्या-

विना मास्क बुलेट सवारी करणं पडली महागात; नवनीत राणा आणि आमदार रवी राणांवर गुन्हा दाखल

गजानन मारणे प्रकरणाला वेगळं वळण; ‘ती’ लॅंड क्रुझर आणणाऱ्यासह 8 जणांना अटक!

पल्लवी पाटीलचे बोल्ड फोटो सोशल मीडियात व्हायरल!

“खडसेंना दोन महिन्यात तीनवेळा कोरोना झाला, शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केलं पाहिजे”

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; गेल्या 24 तासातील आकडेवारी चिंताजनक

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या