बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रुग्ण कमी होत आहे म्हणून सुखावून जाऊ नका”

नागपूर | कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे. पण म्हणून सुखावून जाऊ नका. कोरोनाची तिसरी लाट दारावर आहे. मास्टर प्लान करा, अशा सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिल्या.

नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली काल एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित  होते. याबैठकीत तिसऱ्या लाटेसाठी सज्ज व्हा, असे आदेश राऊतांनी दिलेत.

ऑक्सिजनची उपलब्धता यावरच पुढे बेडची उपलब्धता अवलंबून असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात दहा ठिकाणी क्रायोजनिक ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा संकल्प पूर्ण करा. कोरोना रुग्णांसाठी 5 हजार जंबो सिलेंडर उपलब्ध करणे पुढच्या लाटेत आवश्यक ठरणार आहे, असं राऊत म्हणाले.

वर्षभरात केवळ आरोग्यावर काम सुरू असून नागपूर जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक दशलक्ष रुग्णसंख्येमागे साधारण बेड, आयसीयू बेडसह व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेत महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांना मागे सोडले आहे. मात्र तरीही तज्ज्ञ व शास्त्रज्ञांच्या मते येणारी तिसरी लाट ही अतिशय गंभीर असेल. यामध्ये ही यंत्रणा देखील तोकडी पडू शकते. त्यामुळे युद्धस्तरावर कामाला लागा, असं नितीन राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘कोरोना सेंटरमध्ये भरती होण्यासाठी कोरोना रिपोर्टची आवश्यकता नाही’; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेश

संजय राऊतांनी ममता बॅनर्जींना दिली अहिल्याबाई होळकरांची उपमा, म्हणाले…

#सकारात्मक_बातमी | सात महिन्यांच्या बाळाची कोरोनासह ट्युमरशी यशस्वी झुंज

“मोदींनी महाराष्ट्राचं कौतुक केलं, पण फडणवीस टीका करतात, मग योग्य कोण?”

मक्याच्या शेतातून बँड-बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More