बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाढीव वीज बिल येऊ द्यायचं नसेल तर ‘हे’ करा- नितीन राऊत

मुंबई | रीडिंग न घेता बिले पाठवल्याच्या ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत. म्हणून शक्यतो मीटर रीडिंग घेऊन वीज बिले पाठवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. कोरोनामुळे काही वेळा महावितरणला रीडिंग घेणे शक्य होत नसल्याने ग्राहकांनी जर मोबाईल अ‍ॅपद्वारे रीडिंग पाठवलं तर त्यांना रीडिंगनुसार बिल उपलब्ध करून देता येईल, असं मत उर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

वीज बिलांवरून गोंधळ होऊ नये म्हणून उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर नितीन राऊत यांनी वीज ग्राहकांना महत्वाचं आवाहन केलं आहे.

थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या दुर्दैवी घटना घडत असून त्या खपवून घेतल्या जाणार नाही. महावितरण आणि प्रशासन हे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याचं नितीन राऊतांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ग्राहकांना ऑनलाईन आणि मोबाईल अ‍ॅपद्वारे तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीपण जे ग्राहक याचा वापर करू शकत नाही त्यांच्यासाठी स्थानिक कार्यालयात ऑफलाईन तक्रारी नोंद करून घेण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश नितीन राऊत यांनी यावेळी दिले.

थोडक्यात बातम्या- 

डॉ. आंबेडकर जयंतीला अभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करा- उद्धव ठाकरे

“अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर होते पण या आरोपांची सत्यता काय?”

“…तर 2-4 आठवड्यांतच कोरोना रूग्ण कमी होतील”

पंढरपूरमध्ये भाजपला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘हा’ नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार

लेखक राज ठाकरेंना म्हणाले, जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट, रूपाली पाटील म्हणाल्या, ‘तुला सोडणार नाही…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More