महाराष्ट्र मुंबई

वीज ग्राहक आमचा देव आहे, त्यांचे आम्ही नुकसान करणार नाही- नितीन राऊत

मुंबई | वीज ग्राहक आमचा देव आहे, त्यांचे आम्ही नुकसान करणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले आहेत. ते मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

वीज थकबाकीची देणी गेल्या सरकारनं आमच्या माथ्यावर मारली आहेत. जीएसटीचे पैसे केंद्रानं अद्याप दिलेले नाहीत. 100 युनिट वीजबिल माफीबाबत गट तयार करण्यात आला आहे. कोरोना काळात गटाच्या बैठका झाल्या नाहीत, असं नितीन राऊत यांनी सांगितलं आहे.

भाजप नेत्यांनी वीजबिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं, सर्वांची मी तपासणी करून देईन, जर वाढीव वीजबिलं नसतील, तर त्यांनी प्रॉमिस करावं, आम्ही सर्व वीजबिलं भरू, असं आव्हान ऊर्जामंत्र्यांनी भाजपला दिलं आहे.

भाजपने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले तर आनंदच होईल. कारण मी केंद्राला वारंवार पत्र लिहून ऊर्जा विभागाकडे 10 हजार कोटींच्या अनुदानाची मागणी केली. मात्र, केंद्राने त्यावर अद्यापही निर्णय घेतला नाही, त्यामुळे भाजपने केंद्राविरोधात आंदोलन करावं, असा टोला नितीन राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान!

वीजबिल माफीवरुन काँग्रेसने ठाकरे सरकारला शॅाक द्यावा- आशिष देशमुख

देवेंद्र फडणवीसांना उठाबशा काढू द्या, आम्ही त्यांना चितपट करु- जयंत पाटील

“जनतेच्या मनात उत्सुकता आहे की ठाकरे परिवाराचा मूळ व्यवसाय काय आहे?”

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक डिजीटलपद्धतीने होणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या